१ जुलै पासून लॉकडाऊन ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray on Lockdown l Shivsena latest
१ जुलै पासून लॉकडाऊन ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray on Lockdown l Shivsena latest
महाराष्ट्रात लॉकडाऊन ३० जून नंतर कायम राहणार असलं तरी काळजीपूर्वक काही गोष्टी सुरू करत आहोत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. कोरोनाची संख्या वाढत आहे काही ठिकाणी होणारी गर्दी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे जर तुम्ही गर्दी कराल तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल असे उद्धव ठाकरे म्हणाले
काही जिल्ह्यांमधून लोकडाऊन वाढवण्याची मागणी होत आहे. आपण जे मिशन बिगेन अगेन सुरू केलंय पण धोका टळलेला नाही. पण आपल्याला संकटावर मात करायची आहे. त्यामुळे आपणहून कोरोनाला बळी पडू नका. सुरक्षित अंतर ठेवा आणि गरज नसताना बाहेर पडलात तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे सर्वांना विनंती आहे कुठेही पाणी साठू देऊ नका. पावसाळा एक नवीन नवीन जीवन घेऊन येतो. तसचं केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर अवघ्या देशासाठी मी आषाढीच्या वारीला जाणार आहे
#UddhavThackeray #Shivsena #BJP #Lockdown