लॉकडाऊन मध्ये वर्क फ्रॉम होम | Maharashtrachi Hasya Jatra | Highlights | Sony Marathi
'मनोरंजन नवं, जे सगळ्यांनाच हवं' असं म्हणत सोनी मराठी वाहिनी मनोरंजन क्षेत्रात पुन्हा उतरत आहे. १३ जुलैपासून सर्वांच्या आवडत्या महाराष्ट्राची हास्यजत्राचे नवीन भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांनासुद्धा आता नव्या भागांची आणि त्यांच्या आवडत्या मालिकांच्या पुढच्या गोष्टींची उत्सुकता आहे!
विशाखा-समीरची जोडी ही अवघ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. समीरचा 'जाऊ या गप्पांच्या गावा' हा कार्यक्रम असू दे किंवा तो काढतो ते दरवाजाचे आवाज असू दे, प्रेक्षकांच्या पसंतीस पडत. विशाखाचा अभिनयही समीरच्या तोडीचा आहे.
नम्रताची आगरी व्यक्तिरेखा असो किंवा तिची भन्नाट इंग्लीश बोलणारी लॉली ही व्यक्तिरेखा असो, त्या सगळ्याच प्रेक्षकांना आवडतात. लॉकडाऊनच्या काळात तर ही लॉली खूपच प्रसिद्ध झाली आणि या व्यक्तिरेखेला लोकांकडून खूप प्रेम मिळालं. आणि म्हणूनच नवीन भागातील प्रसाद-नम्रताच्या पहिल्या सादरीकरणात लॉली हे पात्र प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आणि एवढंच नाही तर कोरोनावर आधारित विनोदी स्किटसुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
पाहा, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ १३ जुलैपासून सोमवार ते गुरुवार रात्री ९:०० वाजता आपल्या सोनी मराठी वाहिनीवर आणि SONY LIV APP वर कधीही.....
Footage Courtesy : Sony Marathi
Video Editor : Pranab Bhoi
#MaharashtrachiHasyaJatra #SonyMarathi #MarathiKatta
SUBSCRIBE To Marathi Katta
► https://goo.gl/M22Yy4
Facebook:
https://www.facebook.com/MarathiKattaFBPage
Instagram:
https://www.instagram.com/marathikattaofficial
Twitter:
https://twitter.com/MarathiKattaOff